लहान मुलांसाठी 5 शैक्षणिक अँप्स | Top 5 Educational Apps for Kids in India.

Top 5 Educational Apps for Kids in India

Educational Apps for Kids

मागील काही वर्षांपासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.आपण घरबसल्या ऑनलाइन कोणतेही शिक्षण अगदी कमी खर्चात किंवा विनामूल्य घेऊ शकतो. मागील काही वर्षात ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढल्याचे दिसते. आता सुरळीतपणे ऑफलाईन शाळा सुरू आहेत. परंतु असे भरपूर अँप्स आहे जे तुमच्या लहान मुलांना ऑनलाइन शिकण्यासाठी मदत करू शकतात.आजच्या पोस्टमध्ये आम्ही असे काही ऑनलाइन अँप्स घेऊन आलो आहोत हे जे लहान मुलांना घरी बसल्या फोटो, विडिओ , ऑडिओच्या माध्यमातून मनोरंजकंपणे शिकवतील ज्यात त्यांचे मनोरंजन देखील होऊन त्यांना शिकवलेलं लक्षात देखील राहील.

सर्वोत्तम शैक्षणिक अँप्स लहान मुलांसाठी / Best educational apps for kids in marathi

Khan Academy Kids apps

मागच्या दोन वर्षांत साथीच्या आजरांची संख्या पाहता सगळ्या पालकांना घरातून आपल्या लहान मुलांना स्कुलिंग देण्याचा सगळ्यात बेस्ट ऑपशन आहे.खान अकादमी किड्स हे विणामुल्ये सर्वोत्तम ऑनलाइन शिक्षण अँप्स आहे.खान अकादमी किड्स अँपमुळे शाळेत जाण्यापूर्वीच्या लहान मुलांना मनोरंजकपणे शिकवण्यास फार मदत झाली. सर्वात फायदेशीर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खान अकादमी किड्स अँप हे कोणतीही जाहिरात दाखवत नाही त्यामुळे मुलांना शिक्षक असतांना कोणताही अडथळा येत नाही.

लहान मुलांना मजेदार पध्दतीने त्यांच्या सोबत इंटेरॅक्ट करून त्यांना अक्षरापासून ते मजेदार गोष्टींच्या माध्यमातून लेखन , गणित , वाचन शिकवले जाते.खान अकादमी किड्स अँपमध्ये तुम्हाला विविध ऑपशन दिले जातात त्यामुळे मुलांना त्यांचा मूडनुसार तुम्ही शिकवू शकता.

ABC Kids app

लहान मुलांना सर्वात प्रथम आपन वर्णमाला शिकवत असतो. एबीसी किड्स अँप हे इंग्लिश वर्णमाला शिकवण्यासाठी सर्वोत्तम अँप आहे.एबीसी किड्स अँप लहान games च्या साह्याने मुलांना अक्षराची ओळख करून देण्यात मदत करते.

ABC Kids app चे गेम्स हे मजेदार असल्यामुळे मुलांना त्या गेम्समध्ये अडकून ठेवतात.अशाच प्रकारे प्रत्येक गेम्स मधून मूल नवीन अक्षर शिकतात.ABC Kids app हे 3 ते 10 वयोगटातील लहान मुलांसाठी abcd शिकवणारे बेस्ट अँप आहे.यामध्ये गेम्स,ऑडिओ,चित्र,आकार यांच्या साह्याने इंग्लिश वर्णमाला मजेशीर शिकवली जाते.

Kiddopia app

Kiddopia app हे एक अवॉर्ड जिंकलेले लहान मुलांसाठी बनवलेले शैक्षणिक अँपपैकी एक आहे.या अँपमध्ये शिक्षणाबरोबर मनोरंजन देखील मुलांना मिळते.यामध्ये विविध गेम्स आहे ज्यांच्या साहयाने मुले अगदी सहज बऱ्याच गोष्टी शिकत जातात. Kiddopia app मध्ये शैक्षणिक बरेच विडिओ आणि पझल्स तसेच बरेच प्राणी पक्षी आणि खऱ्या आयुष्यातील पात्रांवर ( डॉक्टर, पोलिस, वकील) आधारीत गेम आहे त्यामुळे त्यांचा ज्ञानात भर पडते.

प्रीस्कूलर लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेले हे किडोपिया अँप लहान मुलांसाठी सेफ आहे.यामध्ये तुमच्या मुलांसाठी पर्यवेक्षणाची कोणतीही गरज नाही.लहान मुले या गेम्स खेळून आणि विडिओ पाहून अधिक ऍक्टिव्ह होतात त्यामुळे मुले हसत खेळत खूप काही शिकतात व मुलांमध्ये उदासीनता येत नाही.कोणत्याही जाहिराती नसल्यामुळे user experience कोणत्याही अडथळा शिवाय चांगला होतो.

Playbees Play & Learn app

प्लेबिस प्ले हे अँपमध्ये लहान मुलांना शाळेत जाण्यापूर्वी संख्या आणि वर्णमाला तसेच बऱ्याच मूलभूत गोष्टी शिकायला मिळतात.मजेदार पद्धतीने तुमची मुले यात अक्षर, संख्या बरोबरच रंग आणि आकारचे ज्ञान देखील मिळवू शकतात.

HeyCloudy app

आजच्या पोस्टमध्ये आपण दिलेले अँप्स ज्यामध्ये गेम्स , विडिओ ,पझल्स इत्यादीच्या माध्यमातून लहान मुले फास्ट शिकतात परंतु काही लहान मुलांचा स्क्रीन टाइम वाढतो आणि ते एकदा adict झाले तर त्यांना त्यामधून बाहेर काढण्यात पालकांना खूप त्रास होऊ शकतो. HeyCloudy app हे विणामुल्ये ऑडिओ कथा, संगीत, आणि पझल्स etc च्या माध्यमातून शिक्षण देतात.तसेच याअँप मधील प्रीमियम गोष्टी तुम्हाला अनलॉक करायच्या असतील तर तुमची त्यांचा प्लॅन देखील घेऊ शकता.

HeyCloudy app मुळे मुलांना गोष्टीं मधून शिकण्याचे आपल्या बुद्धीचा विकास , शब्द संग्रह वाढवण्यास, तसेच लक्ष केंद्रित करण्याचे आणि ऐकण्याचे स्किल सुधारण्यास मदत करते.HeyCloudy app च्या मदतीने तुम्ही तुमच्या लहान मुलांचा स्क्रीन टाइम कमी करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top